
अतिविशाल सागरही प्रेमाच्या ओढीने धावत रहातो,
मूक साथ देणारा किनारा स्तब्धपणे पहात रहातो...1
तोही वेडा तिच्यामागे अखंडपणे धावत रहातो,
उद्याची स्वप्ने रंगवताना आजला सुरंग लावत रहातो...2
तिच्या प्रीतीत् धुंद होऊन स्वप्नांच्या थप्प्या लावत रहातो,
शुन्यात नजर लावुन नशिबाला बोल लावत रहातो...3
नियती काय असते माहीत असुनही तिला बदलायला पहात रहातो,
पण नियती कधी एकटी नसते दुर्देवाचा फ़ेरा तिच्या प्रेमात वहात रहातो...4
तरीही तो वेडा आपले नशीब आजमावत रहातो,
आणि बाजुला समदुःखी समुद्र शांतपणे वहात रहातो...5
- संविद


1 Comments:
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
Post a Comment
<< Home