हातात सगळ असुनही
ऊगाच ताटकळत रहाव लागत
जन्माला आलोच आहे
तर मरेपर्यन्त जगाव लागत................1
फ़क्त नशीब नावाच्या या चक्रावर
ऊगाच हिंदकळत रहाव लागत
इच्छा असो वा नसो
अश्रुंना देखील मन माराव लागत.............2
पायात जोर असुनही
कुबडयाच्या अधीन व्हाव लागत
आवडत ते सगळ मिळत नाही
हेही दुःख पचवाव लागत.....................3
सन्धी फ़क्त एकदाच मिळते
त्यातच सगळ कराव लागत
आणी शक्य नाही झाल तर
अशा कविता करत बसाव लागत.............4
- संविद


0 Comments:
Post a Comment
<< Home