Sunday, October 01, 2006

मलाच काहीतरी करायला हवं होत...
न बोलता बोललेले शब्द तु कधी ऎकले नाहीस
त्या धडधडणाय्रा हदयाचे ठोके तुला कधी समजलेच नाहीत
आणि आता ओल्या डोळ्यांनी म्हणतेस
तु कधी सांगितले नाहीस... त्याला मी काय़ करु

इतक्या दिवसांचं ते हसून बॊलणं बॊलताना हसणं
तो कललेला सूर्य आणि तुला तसं ऎकत रहाणं
तुझ्याकडे पाहणं अन तुझा हात अलगद हातात घेणं
तुला तो स्पर्श कधी जाणवलाच नाही... त्याला मी काय़ करु

तुझ्या नजरेपासून नजर लपवणं
हाताच्या एका कोपाय्रात तुझं नाव लिहीणं
मित्रांमधे त्यांनी मला तुझ्या नावाने चिडवणं
तुला कधी दिसलच नाही... त्याला मी काय़ करु

तु कधी तुझं मन मोकळ केलच नाहीस
ते हवेहवेसे शब्द कधी बोललीच नाहीस
मी आधी बोलायला हवं ही तुझी अपेक्शा मला कधी कळलीच नाही
तुझ्या त्या हसण्यालाच होकार धरुन
बसलो न बोलताच सगळ काही होइल
अस धरुन चाललॊ... पण असं कधी घडलच नाही...त्याला मी काय़ करु

पण तु सोडून जाताना माझ्या डोळ्यातलं पाणी तुला दिसेल
सायंकाळी माझं तस एकटं बसणं तुला खुपेल
माझा अबोला अन ती धड्धड तुला ऎकू येइल... आता याचा काय उपयोग
खरच मलाच काहीतरी करायला हवं होत.....

3 Comments:

At 9:55 AM, Blogger ramesh said...

hello Avi,
good one keep it up

 
At 9:06 AM, Blogger jags said...

sundar aavishkar aahe ........

 
At 9:14 PM, Blogger swapnil said...

Hey Sanvid,
Your aavishkar is awesome yaar.
Pls keep it up.

 

Post a Comment

<< Home